नीलचक्रांकित तिरंगी राष्ट्रध्वज हा आपल्या भूतकाळातील सर्व राष्ट्रीय भावना आणि भविष्यकाळाबद्दलच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्णपणे व्यक्त करणारा आहे
स्वतंत्र भारताची राज्यघटना ठरवण्यासाठी घटना समिती नेमण्यात आली होती. या घटना समितीने अशोक चक्रांकित राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. या नव्या राष्ट्रध्वजातील तीन रंग हे स्वातंत्र्याचे सत्य, शांतीची शुचिता व समृद्धीचे सौंदर्य व्यक्त करणारे असून, त्यावरील अशोक चक्र हा प्रगतिपर सद्धर्मपालनाचा निदर्शक आहे. प्रखर भूतकाळ आणि उज्ज्वल भविष्यकाळ, या दोन्हीकडे एकाच वेळी लक्ष वेधण्याचे काम तिरंगा करतो.......